- पंडीत शंकरप्रसादजी अग्निहोत्री म्हणाले
Wardha वर्धा, 15 फरवरी
स्थानिक अग्निहोत्री कॉलेज ऑफ फार्मसी व अग्निहोत्री इंस्टीटयूट ऑफ फार्मसी यांच्या सयुंक्त विद्यमाने बापुजी वाडी सिंदि (मेघे) स्थित अग्निहोत्री ग्रुप ऑफ इंस्टीटयूशन येथील शिव शंकर सभागृहामध्ये अग्निहोत्री फार्मा यूथ फेस्टिवल – 2025 अंतर्गत विदर्भ स्तरीय नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली.
या मध्ये विदर्भातील डिप्लोमा इन फार्मसी कॉलेज मधून 32 विविध कॉलेजनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथि Dr. Jacob Kurian Chamathil (Principal Priyadarshani JL Chaturvedi College of Pharmacy Nandanvan, Nagpur) यांनी स्वतः मध्ये जर विद्यार्थांनी सातत्य ठेवल्यास आपण जीवनात असाधारण ऊंची नक्कीच गाठू शकतो. तर जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. श्री. शंकरप्रसाद्जी अग्निहोत्री यांनी विद्यार्थांना जीवनात आवश्यक मूलभूत बाबीवर प्रकाश टाकला. तसेच विद्यार्थांना जीवनामध्ये संस्कृतिक कार्यक्रमाची का गरज आहे या बद्दल मार्गदर्शन केले.
तसेच अग्निहोत्री कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. प्रसाद जुमडे यांनी “युवाशक्ति” बद्दल विशेष व्याख्यान केले असता त्यात त्यांनी संगितले की, या स्पर्धेमध्ये होत असलेले नृत्य फक्त मनोरंजनापूरते नसून आपल्याजीवनात असलेल्या प्रश्नांचे समाधान व्हावे या करिता हा कार्यक्रम घेण्यात आला. असे बोलून विद्यार्थांचे मनोबल वाढवले.
व्यासपीठावर जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. श्री. शंकरप्रसाद्जी अग्निहोत्री, अग्निहोत्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य दिनेश वंजारी आणि अग्निहोत्री कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ प्रसाद जुमडे, डॉ.राम बावनकर, तसेच, प्रा.जयश्री दलाल, प्रा.प्रशांत वाके, प्रा. अमितकुमार लोकडे, प्रा.वृशाली माकडे, ई. उपस्थित होते.
कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून श्री.संजय आचार्य आणि सौ.शुभांगी भोयर यांनी उपस्थिती दर्शविली. पहिल्या परितोषिकाचे मानकरी थीम नेमगणपती (श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी कामठी),दुसऱ्या परितोषिकाचे मानकरी थीम नेमएक नजर जिंदगी की और (अग्निहोत्री इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी) तिसऱ्या परितोषिकाचे मानकरी theme name_छत्रपती संभाजी महाराज (श्री घारफळकर कॉलेज ऑफ फार्मसी, पुलगाव) हे ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अग्निहोत्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.दिनेश वंजारी आणि अग्निहोत्री कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.प्रसाद जुमडे, प्रा.जयश्री दलाल, प्रा.खुशबू व्यास, डॉ. राम बावनकर, प्रा.प्रशांत वाके, प्रा.बंडू कडू, प्रा.धनंजय सावरकर, प्रा.नीलेश वाघ, प्रा.आकाश कापसे, प्रा.शैलेश पिसे, डॉ.मोनाली वावरे, प्रा.नेहा शेटे, प्रा.दिपाली कांबळे, प्रा. अमितकुमार लोकडे, प्रा.वृशाली माकडे, प्रा.अंजली पाटील, प्रा.अभिजीत डफ, प्रा.कांचन माकडे, प्रा. स्नेहा कापसे, प्रा. कोमल जबलपुरे, प्रा. कोमल सदराणी, प्रा.प्रिया वानकर प्रा.स्नेहल गौळ्कर, प्रा. रजनी बावणे, प्रा. कामिनी अवठळे, श्रद्धा तेलरांधे, प्रा.मेघना चव्हाण, प्रा.रोशन सातसुरे, प्रा.निकिता सपकाळ, प्रा.अनुप बन्नागरे, प्रा.आकाश भोयर, प्रा.दीपली पंढरे, प्रा. चन्द्रशेखर पवार आणि शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
